Chaitanya Sudarshan Mundhe

औरंगाबाद येथील चैतन्य सुदर्शन मुंढे ला Twitter कंपनी चे वार्षिक ८० लाखाचे पॅकेज.

चैतन्य मूळचा पिंपळदरी (गंगाखेड) चा असुन वडील डीवायएसपी या पदावर सिल्लोड येथे कार्यरत आहेत. चैतन्यचे व त्याच्या आईवडिलांचे वंजारीवर्ल्ड तर्फे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा! 

Kalpana Vasant Munde

एका सर्वसामान्य कुटुंबातील, रिक्षाचालकाची मुलगी, कन्हेरवाडी (परळी) ची कल्पना वसंतराव मुंडे एमपीएससी च्या Tax Assistant या परीक्षेत मुलीमध्ये राज्यात प्रथम! 

कन्हेरवाडी (परळी) म्हणजे माजी आमदार स्वर्गीय रघुनाथराव मुंडे साहेबांचे गाव.. पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांची सासरवाडी.. उस्मानाबादी शेळीचे जनक डॉ वसंतराव मुंडे यांचे जन्मगाव.. परभणी जिल्ह्यात ज्यांनी शून्यातून भाजपा वाढविली ते शामसुंदरराव मुंडे (बंधु) याच गावातील.. कॉंग्रेसचे बाबुराव मुंडे याच गावातील.. स्वर्गीय संभाजीराव मुंडे (उपजिल्हाधिकारी), श्रीनिवास मुंडे (निवृत्त सहाय्यक पोलीस कमिशनर) व विश्वास मुंडे ( डेप्युटी कमिशनर आयकर विभाग), राष्ट्रीय पैलवान प्रतिक्षा मुंडे पण कन्हेरवाडी याच गावातील..

कन्हेरवाडी (परळी) या डोंगर पायथ्याशी वसलेल्या गावातील, एका सामान्य कुटुंबातील, रिक्षाचालकाची मुलगी कल्पना वसंतराव मुंडे एमपीएससी च्या Tax Assistant या परीक्षेत मुलीमध्ये राज्यात प्रथम आली ही बातमी ऐकली आणि ऊर अभिमानाने भरून आला. कल्पना चे कौतुक करावे तेवढे थोडेच. कल्पनाला व तिच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा.

बीड जिल्यातील परळी जवळील कन्हेरवाडी या ग्रामीण भागातील ही मुलगी शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार होती घरची परिस्थिती जेमतेम असल्याने बारावी नंतर इंजिनिअरिंग ला जायचे स्वप्न मनातच ठेवून B Sc परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयातून केले. पदवीचे शिक्षण घेत असताना खाजची शिकवणी वर्गावर पार्ट टाइम जॉब केला व अभ्यासात सातत्य ठेवले . मराठी, इंग्लिश ची तयारी करण्यासाठी 4 महिने पुण्यात येऊन क्लास केले नंतर मात्र परीक्षांची तयारी अंबाजोगाई येथील अभ्यासिकेत अभ्यास करून केली.

समांतर आरक्षणाचा फटका बसल्यामुळे 2016, 2017 च्या राज्यसेवा परीक्षेत चांगले गुण असूनही मुख्य परीक्षा देता आली नाही. PSI, STI या परीक्षांमध्ये open मुलींच्या गुणांपेक्षा हमखास जास्त गुण असूनही मुख्य परीक्षा देता आली नाही मात्र तिने निराश न होता ओपन मधूनच पद मिळेल अशी तयारी करायचे ठरवले अन ती नगरपालिकेत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी म्हणून 2 महिन्यांपूर्वी रत्नागिरी येथे रुजू झाली. MPSC CLERK च्या परीक्षेत NTD मुलींमध्ये दुसरी आली तर Tax Assistant या परीक्षेत राज्यातून मुलींमध्ये प्रथम आली. ओपन महिला 101 गुणांवर तर खुला गट 114 गुण असा cut off असताना कल्पनाला 118 गुण आहेत तिच्या जिद्दीचे मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे.. मात्र यावर ती समाधानी नाहीये तर तिला राज्यसेवा परीक्षेतून पद मिळवायचे आहे त्यासाठी सध्या ती तयारी करत आहे. कल्पनाताईने मिळवलेल्या यशासाठी तिचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!!

 

 

कधी थांबेल ही भटकंती!

YouTube वरील “कधी थांबेल ही भटकंती!” हा माहितीपट आपण पाहिलाच असेल अशी आशा बाळगतो! कधी थांबेल ही भटकंती?’ हा माहितीपट ऊसतोड मजुरांच्या व्यथा आणि संघर्ष शासन, साखर कारखानदार, राजकीय नेते, मुकादम, सामाजिक संस्था, अधिकारी व सर्व सामान्य नागरिक यांच्यासमोर सादर करून ऊसतोड मजुरांचे प्रश्न मार्गी लावण्याचा एक प्रयत्न आहे.
एक दिवस समाजासाठी फौंडेशन तर हे काम करणारच आहे, तुम्ही पण यात सहभागी व्हा आणि ऊसतोड मजुरांना न्याय मिळवून द्या. ऊस तोडणी कामगार व मजुरांच्या मुलांनी शिकले पाहिजे आणि त्यांना शिकण्यासाठी समाजाने मदत केली पाहिजे!

कधी थांबेल ही भटकंती! “When this Migration will Stop?” This documentary is on Struggle and Sufferings of Migrant Sugarcane Cutting Laborers from Maharashtra , the most Advanced and Industrialized State of India.
Seasonal migration of 4-6 months from Marathwada & adjoining areas to Western Maharashtra, Karnataka, Gujrat & Madhya Pradesh leads to Illiteracy, Poverty, Health and Hygiene issues, Malnutrition, Social problems like sexual exploitation, Atrocities, Slavery. And this has been faced and suffered by generations. Surprisingly Govt of Maharashtra, Sugar Factory Owners, Politicians and even Majur-Mukadam Organizations are silent on this.
Lets’ give justice to Migrant Sugarcane Cutting Laborers..
https://youtu.be/utS6YMPTErU

⇒ऊसतोड मजुरांच्या मुलांचे ‘बुरे दिन’! मुलांच्या हाती वही-पेन नव्हे कोयता, उसाच्या फडात शोधताहेत भविष्य!! कोठे आहेत साखर शाळा? कधी थांबेल ही भटकंती?? शासनकर्ते, शोषितांचे वंचितांचे नेते व कार्यकर्ते यांना हे ऊसतोड मजुरांचे मुले आणि त्यांच्या शिक्षणाचे हेळसांड दिसत नाही ही एक शोकांतिकाच आहे!

⇒ऊसतोड मजुरांना मदत करा, त्यांनी बैलासारखे राबून तयार केलेला उसाचा रस घासाघीस न करता प्या!!

⇒सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे ?
माढा तालुक्यात पोलीसांनी केलेल्या मारहाणीत रविवारी एका ऊसतोड वाहतूक करणा-या मजुराचा मृत्यू झाला.ऊसतोड मजुरांना सरकार कोणत्याही सोई-सवलती, सुविधा देत नाही. ऊसतोड कामगार महामंडळाचाही पत्ता नाही, या मजुरांना साधी सुरक्षाही मिळत नाही.
पोलिसांच्या मारहाणीत ऊसतोड मजुराचा मृत्यु व्हावा ही अतिशय दुर्देवी घटना आहे. याची चौकशी आणि कडक कारवाई झाली पाहिजे.

No end to struggle & sufferings of #Suagrcane Harvest #Laborers! https://www.youtube.com/watch?v=1wxaBGR8SrM

And incidents like #Kasarsai , #Murder of Sugarcane Laborer in Madha Tehsil creates more question mark!

⇒कासारसाई (हिंजवडी) पुणे येथील लैंगिक अत्याचाराची झालेली घटना व माढा तालुक्यात पोलीसांनी केलेल्या मारहाणीत ऊसतोड मजुराचा झालेला मृत्यू ……ऊस तोड मजुरांवर होणार्‍या या अन्यायाबद्दलची चौकशी आणि कडक कारवाई झाली पाहिजे.

⇒ऊसतोड मजुरांच्या व्यथा आणि संघर्ष यांना काही शेवट नाही, म्हणून काय हातावर हात चोळत बसायचे? आपण सर्वानी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना काही तरी मदत करायची ठरवली तर त्यांच्या जीवनातील काही अडचणी निश्चितच दूर होतील.. या समस्यांचा विचार करून, एक खारीचा वाटा म्हणून एक दिवस समाजासाठी फौंडेशन ने ऊसतोड मजुरांना व त्यांच्या मुलांना उपयोगी पडेल अशी एक भेट योजना तयार केली आहे. ती खालील प्रमाणे आहे..

अ क्र

समस्या

उपाय

प्रतिनिधिक फोटो

आवश्यक देणगी

   1 ऊसतोड कॅम्प वरील छोटे अपघात, इजा आणि किरकोळ आजार प्राथमिक उपचार सुविधा. EDS First Aid Kit  

Rs 500 /-

   2 हंगामी स्थलांतरामुळे शिक्षणाचे हेळसांड

 

ऊसतोड कॅम्प मध्ये मुलामुलींची शिक्षणाची आवड टिकून राहावी यासाठी शैक्षणिक व ड्रॉईंग किट. EDS Educational Kit

Rs 400 /-

   3 ऊसतोडीच्या ठिकाणी कोपी / झोपडी मध्ये विजेची असुविधा ग्रीन एनर्जी किट / सोलर लॅम्प. EDS Green Energy Kit  

Rs 350 /-

   4 ऊसतोड कॅम्पवरील छोटे अपघात, इजा आणि किरकोळ आजार. हंगामी स्थलांतरामुळे शिक्षणाचे हेळसांड. ऊसतोडीच्या झोपडी मध्ये विजेची असुविधा एक दिवस समाजासाठी फॅमिली किट EDS Family Kit. (EDS First Aid Kit + EDS Educational Kit + EDS Green Energy Kit)  

Rs 1000 /-

एक दिवस समाजासाठी फौंडेशन ने  प्रथम टप्प्यामध्ये 1000 ऊसतोड परिवारापर्यंत फॅमिली किट पोहोचवण्याचे नियोजन केले आहे.  आपण सढळ हाताने मदत करावी ही विनंती. चला तर मग, आपण ऊस तोडणी मजुरांचे जीवन बदलवू या, मुलांच्या शिक्षणाची आणि महिलांच्या आरोग्याची हेळसांड थांबवू या! एक दिवस समाजासाठी देऊ या!!

एक दिवस समाजासाठी, लढूया ऊस तोड मजुरांसाठी !!! धन्यवाद..