एक दिवस समाजासाठी, लढू या ऊसतोड मजुरांसाठी !

सप्रेम नमस्कार! YouTube वरील “कधी थांबेल ही भटकंती!” हा माहितीपट आपण पाहिलाच असेल अशी आशा बाळगतो!  ऊसतोड मजुरांच्या व्यथा आणि संघर्ष यांना काही शेवट नाही, म्हणून काय हातावर हात चोळत बसायचे? आपण सर्वानी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना काही तरी मदत करायची ठरवली तर त्यांच्या जीवनातील काही अडचणी निश्चितच दूर होतील..

या समस्यांचा विचार करून, एक खारीचा वाटा म्हणून एक दिवस समाजासाठी फौंडेशन ने ऊसतोड मजुरांना व त्यांच्या मुलांना उपयोगी पडेल अशी एक भेट योजना तयार केली आहे. ती खालील प्रमाणे आहे..

अ क्र

समस्या

उपाय

प्रातिनिधिक फोटो

आवश्यक देणगी

    1 ऊसतोड कॅम्प वरील छोटे अपघात, इजा आणि किरकोळ आजार प्राथमिक उपचार सुविधा. EDS First Aid Kit   Rs 500 /-
   2 हंगामी स्थलांतरामुळे शिक्षणाचे हेळसांड

 

ऊसतोड कॅम्प मध्ये मुलामुलींची शिक्षणाची आवड टिकून राहावी यासाठी शैक्षणिक व ड्रॉईंग किट. EDS Educational Kit Rs 400 /-
   3 ऊसतोडीच्या ठिकाणी कोपी / झोपडी मध्ये विजेची असुविधा ग्रीन एनर्जी किट / सोलर लॅम्प. EDS Green Energy Kit   Rs 350 /-
   4 ऊसतोड कॅम्पवरील छोटे अपघात, इजा आणि किरकोळ आजार.             हंगामी स्थलांतरामुळे शिक्षणाचे हेळसांड. ऊसतोडीच्या झोपडी मध्ये विजेची असुविधा एक दिवस समाजासाठी फॅमिली किट EDS Family Kit. (EDS First Aid Kit + EDS Educational Kit + EDS Green Energy Kit)   Rs 1000 /-

एक दिवस समाजासाठी फौंडेशन ने  प्रथम टप्प्यामध्ये 1000 ऊसतोड परिवारापर्यंत फॅमिली किट पोहोचवण्याचे नियोजन केले आहे.  आपण सढळ हाताने मदत करावी ही विनंती.  धन्यवाद!