
माणसाला सामाजिक प्राणी (Social Animal) म्हटलं जातं. एका भौगोलिक क्षेत्रातील, एका व्यवसायाचे, एका कुळात जन्मलेले किंवा एकप्रकारचे हितसंबंध असलेले लोक भाऊ बंधकीने, नात्यागोत्याने, देवाण घेवाणीतून एकमेकांशी जुळले जातात. यामुळे विविध सामाजिक संबंध (Social Relations) निर्माण होतात. अशा प्रकारच्या अनेक संबंधापैकी भारतीय परंपरेत जाती संबंधांना विशिष्ट स्थान प्राप्त झाले आहे. सुरुवातीला व्यवसायाच्या आधारावर विभागलेल्या जाती काळाच्या ओघात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय अंगामुळे बळकट होत गेल्या. जातीचा घटक असलेला माणूस आपल्या समाजाप्रती बांधिलकी ठेवतो तसेच समाजाने घालून दिलेली बंधने पाळून एक प्रकारचे ऋणानुबंध निभावत असतो. आपल्याला समाजामुळे ओळख मिळते तर आपल्या सामाजिक कर्तव्याने समाज सुदृढ होतो.
संपूर्ण देशात अत्यंत कष्टकरी, इमानदार आणि निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंजारी समाजात आपण जन्मलो. आपल्या पूर्वजांनी मेहनतीने परिश्रमाने समाजाची ओळख निर्माण केली आहे. ऊस तोडणीसारखे अंगमेहनतीचे काम असो, सर्वोच्च प्रशासकीय पद असोत, व्यावसायिक क्षेत्रात प्रगती असो, राजकीय क्षेत्रात दबदबा असो, राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय संस्थांमध्ये कार्य असो; आपल्या समाजाचे प्रतिनिधी सर्व स्तरावर सर्वत्र कार्यरत आहेत.
आपल्या सर्वांमध्ये संपर्क व सुसूत्रता असावी आणि विचारांची देवाण घेवाण व्हावी यासाठीची धडपड EDS Foundation and VanjariWorld ची टीम करत आहे. आज पर्यंतचे उपक्रम अगदी अभिनव, शिस्तीचे आणि समाज उपयोगी झालेले आहेत. हे सर्व करत असताना इतर कोणत्याही जाती समूहाशी वैर, स्पर्धा किंवा ईर्षा न बाळगता केवळ आपल्या समाजाविषयी स्वाभिमान निर्माण करणे, एकमेकांच्या सहकार्यातून सामुदायिक कार्य निर्माण करणे हा उद्दात्त हेतू समोर ठेवून अजय मुंडे आणि टीम कार्य करत आहे. सर्व बंधू भगिनींना या वेबसाईट च्या माध्यमातून एकत्र आणून सर्वसमावेशक आणि सांघिक विकास साधता येईल असा मला विश्वास आहे. पुढील सर्व उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा !
COPYRIGHT © 2025
Designed with by Website Developer Pune - (A Marttalk Company)