आवजीनाथ महाराज


Personal Details

native place Virgaon Ta Akole Dist Ahmednagar
few facts to know श्री. समर्थ आवजीनाथ बाबा यांचा जन्म विरगाव ता.अकोले जि. अहमद्नगर येथे वंजारी समाजातील गोह्रे घराण्यात ३५० वर्षांपूर्वी झाला होता. त्यांचे लहानणीच मातृ-पितृ छाया हरपले होते. त्यामुळे त्यांच्या पालनपोषणची जबाबदारी मिरपुर लोहारे गावचे रनमळे या मामांनी घेतली होती. [१] मामांकडे आसतांना श्री.आवजीनाथ बाबा जनावरे चारण्याचे काम करीत असत, गावातील त्यांचे संवगडी समवेत श्री. समर्थ आवजीनाथ बाबा जनावरे चारण्यासाठी उंच डोंगरावर जात असे व सगळे संवगडी दुपारच्या वेळी एकत्रीत भोजन करीत असत. एकेदिवशी दुपारच्या वेळेस सगळे संवगडी भोजन आटपुन बसले होते, कुणी खेळत होत तर कुणी जनावरे चारत होत, परंतु श्री. समर्थ आवजीनाथ बाबा तिथे नव्हते, श्री.समर्थ आवजीनाथ बाबा त्यावेळेस जनावरे घेउन उंच डोंगर माथ्यावर गेले होते. त्याठिकाणी जनावरे चारीत आसतांना त्यांना एक साधु महाराज भेटले. त्या साधु महाराजांचे श्री. समर्थ आवजीनाथ बाबांनी दर्शन घेतले आणी त्यांची सेवा करु लागले. त्यावेळेस साधु महाराजांनी त्यांच्याकडे भोजनांची ईच्छा व्यक्त केली, परंतु श्री.समर्थ आवजीनाथ बाबांकडे फक्त शिळ्या भाकरी होत्या. मात्र तरीही त्या शिळ्या भाकरी सुध्दा त्या साधु महाराजांनी आनंदाने खाल्ल्या आणि श्री. समर्थ आवजीनाथ बाबांना सुध्दा देखील खावायास दिल्या. त्यानंतर श्री. समर्थ आवजीनाथ बाबांनी त्या साधु महाराजांशी गप्पा करण्यात मग्न होऊन गेले. ते साधु महाराज दुसरे कुणी नसुन साक्षात श्री. ब्रम्हचैतन्य कानिफनाथ महाराज होते. श्री. ब्रम्हचैतन्य कानिफनाथ महाराजांच्या सानिध्यात श्री. समर्थ आवजीनाथ बाबांना काही भान राहिले नाहि. संध्याकाळ होऊन गेली तरीहि श्री. समर्थ आवजीनाथ बाबा फक्त श्री. ब्रम्हचैतन्य कानिफनाथ महाराजांचेच नाम घेत होते आणि नाम घेता घेता बेशुध्द झाले. झालेला सर्व प्रकार पाहुन श्री. समर्थ आवजीनाथ बाबांचे सवंगडी घाबरले त्यांनी थेट श्री. समर्थ आवजीनाथ बाबांच्या मामाला हा प्रकार सांगितला. रात्र झालेले होती त्यामुळे मामांनी काही निवडक ग्रामस्थांच्या समवेत श्री. समर्थ आवजीनाथ बाबा जेथे बेशुध्द होऊन पडले होते तेथे जाऊन श्री.समर्थ आवजीनाथ बाबांना घरी घेऊन आले. श्री. समर्थ आवजीनाथ बाबांना दुसऱ्या दिवशीहि शुध्द येईना म्हणुन श्री. समर्थ आवजीनाथ बाबांचा मृत्यु झाला असे समजुन मामा,त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांच्या अंत्यविधिची तयारी केली व श्री.समर्थ आवजीनाथ बाबांना स्मशानभुमित नेले. तिथे नेल्यावर श्री. समर्थ आवजीनाथ बाबांना शुध्द आली आणि ते उठुन बसले. या प्रकारा नंतर सर्व उपस्थितांना मध्ये आनंद झाला व त्यांनी श्री. समर्थ आवजीनाथ बाबांना घरी येण्याबाबत आग्रह केला. परंतु श्री. समर्थ आवजीनाथ बाबा काहि केल्या घरी येईना. शेवटी ग्रामस्थ हतबल झाले, त्यावर श्री. समर्थ आवजीनाथ बाबा म्ह्णाले “मी येथेच राह्णार मला येथेच जिवंत समाधी घ्यावयाची आहे” असे म्ह्णत श्री.ब्रम्हचैतन्य कानिफनाथ महाराजांचा मंत्रघोष चालू ठेवला. श्री. समर्थ आवजीनाथ बाबांच्या आग्रहामुळे मामा, नातेवाईक आणी ग्रामस्थांचा नाईलाज झाला आणि घट्स्थापनेच्या दिवशी श्री. समर्थ आवजीनाथ बाबांनी समाधी स्थळात समाधी घेतली. नऊ दिवसानंतर समाधी स्थळामध्ये बाबांची प्राणज्योत मावळली, तो दिवस होता विजयादशमीचा (दसरा), तेव्हांपासून आजपर्यंत श्री. क्षेत्र मिरपुर लोहारे या गावी नवरात्री उत्सव (दसरा) साजरा होत आहे. श्री. क्षेत्र मढी येथे श्री. समर्थ आवजीनाथ बाबांचा काठीचा मान असुन, श्री. क्षेत्र मढी येथील रंगपंचमीच्या यात्रेच्या दिवशी श्री.ब्रम्हचैतन्य कानिफनाथ महाराजांच्या मंदिराच्या कळसाला श्री.समर्थ आवजीनाथ बाबांच्या काठीचा स्पर्श होताच कळस गोलाकार फिरतो, त्यावेळेस सर्व उपस्थित भक्तगण श्री.ब्रम्हचैतन्य कानिफनाथ महाराज व श्री. समर्थ आवजीनाथ बाबांच्या जय जय काराने संपुर्ण आसमंत दुमदुमन जातो