एका सर्वसामान्य कुटुंबातील, रिक्षाचालकाची मुलगी, कन्हेरवाडी (परळी) ची कल्पना वसंतराव मुंडे एमपीएससी च्या Tax Assistant या परीक्षेत मुलीमध्ये राज्यात प्रथम! 

कन्हेरवाडी (परळी) म्हणजे माजी आमदार स्वर्गीय रघुनाथराव मुंडे साहेबांचे गाव.. पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांची सासरवाडी.. उस्मानाबादी शेळीचे जनक डॉ वसंतराव मुंडे यांचे जन्मगाव.. परभणी जिल्ह्यात ज्यांनी शून्यातून भाजपा वाढविली ते शामसुंदरराव मुंडे (बंधु) याच गावातील.. कॉंग्रेसचे बाबुराव मुंडे याच गावातील.. स्वर्गीय संभाजीराव मुंडे (उपजिल्हाधिकारी), श्रीनिवास मुंडे (निवृत्त सहाय्यक पोलीस कमिशनर) व विश्वास मुंडे ( डेप्युटी कमिशनर आयकर विभाग), राष्ट्रीय पैलवान प्रतिक्षा मुंडे पण कन्हेरवाडी याच गावातील..

कन्हेरवाडी (परळी) या डोंगर पायथ्याशी वसलेल्या गावातील, एका सामान्य कुटुंबातील, रिक्षाचालकाची मुलगी कल्पना वसंतराव मुंडे एमपीएससी च्या Tax Assistant या परीक्षेत मुलीमध्ये राज्यात प्रथम आली ही बातमी ऐकली आणि ऊर अभिमानाने भरून आला. कल्पना चे कौतुक करावे तेवढे थोडेच. कल्पनाला व तिच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा.

बीड जिल्यातील परळी जवळील कन्हेरवाडी या ग्रामीण भागातील ही मुलगी शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार होती घरची परिस्थिती जेमतेम असल्याने बारावी नंतर इंजिनिअरिंग ला जायचे स्वप्न मनातच ठेवून B Sc परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयातून केले. पदवीचे शिक्षण घेत असताना खाजची शिकवणी वर्गावर पार्ट टाइम जॉब केला व अभ्यासात सातत्य ठेवले . मराठी, इंग्लिश ची तयारी करण्यासाठी 4 महिने पुण्यात येऊन क्लास केले नंतर मात्र परीक्षांची तयारी अंबाजोगाई येथील अभ्यासिकेत अभ्यास करून केली.

समांतर आरक्षणाचा फटका बसल्यामुळे 2016, 2017 च्या राज्यसेवा परीक्षेत चांगले गुण असूनही मुख्य परीक्षा देता आली नाही. PSI, STI या परीक्षांमध्ये open मुलींच्या गुणांपेक्षा हमखास जास्त गुण असूनही मुख्य परीक्षा देता आली नाही मात्र तिने निराश न होता ओपन मधूनच पद मिळेल अशी तयारी करायचे ठरवले अन ती नगरपालिकेत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी म्हणून 2 महिन्यांपूर्वी रत्नागिरी येथे रुजू झाली. MPSC CLERK च्या परीक्षेत NTD मुलींमध्ये दुसरी आली तर Tax Assistant या परीक्षेत राज्यातून मुलींमध्ये प्रथम आली. ओपन महिला 101 गुणांवर तर खुला गट 114 गुण असा cut off असताना कल्पनाला 118 गुण आहेत तिच्या जिद्दीचे मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे.. मात्र यावर ती समाधानी नाहीये तर तिला राज्यसेवा परीक्षेतून पद मिळवायचे आहे त्यासाठी सध्या ती तयारी करत आहे. कल्पनाताईने मिळवलेल्या यशासाठी तिचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!!

 

 

2 thoughts on “Kalpana Vasant Munde

  1. Murlidhar Madanrao Munde

    I have visited this site earlier. Excellent job done. Best wishes always.

  2. सुनिल व्ही मुंडे

    आपल्या समाजात टॅलेंट भरपूर आहे पण योग्य मार्गदर्शन मिळाले तर सोनेपे सुहागा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*