नामदेवशास्त्री सानप


Personal Details

professional summary नामदेवशास्त्री सानप हे महाराष्ट्रातील एक संत, प्रवचनकार व कीर्तनकार आहेत. भीमसिंह महाराजच्या मृत्यूनंतर भगवानगडावरील गादीचे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी भगवानगडाची जबाबदारी सांभाळत आहेत. भगवानबाबाचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी तेथील मंदिराचा मोठा विकास केला आहे. अाळंदी,पंढरपुर,पैठण व औरंगाबाद या ठिकाणी भगवान गडाचे मोठे मठ त्यांनी ऊभारले आहेत. तसेच भगवान गड येथे वारकरी शिक्षण देणारे संत विद्यापीठ 2004 साली स्थापण करून वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम सुरू आहे. गुरुवंश परंपरा नारायण ब्रह्मदेव अत्री ऋषी दत्तात्रेय जनार्दनस्वामी संत एकनाथ गावोबा किंवा नित्यानंद अनंत दयानंद स्वामी पैठणकर आनंदॠषी नगदनारायण महाराज महादेव महाराज (पहिले) शेटीबाबा (दादासाहेब महाराज) गोविंद महाराज नरसू महाराज महादेव महाराज (दुसरे) माणिकबाबा भगवानबाबा भीमसिंह महाराज नामदेवशास्त्री सानप [१] श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांचे गडाच्या विकासासाठी ६० फूट उंच महाद्वार, सभामंडप, दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके सामावतील असे भव्य वाचनालय, गडाच्या पायथ्याशी वातानुकूलित अतिथी निवास, उद्यान, दवाखाना, योग निसर्गोपचार केंद्र , जॉगिंग ट्रॅक, ध्यानधारणा केंद्र, भगवानबाबांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे भव्य संग्रहालय, रेसिडेन्शियल इंग्लिश शाळा, गडाच्या पायथ्याशी देवस्थानच्या १६ एकर जागेत हेलिपॅडची सुविधा वगैरे बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सद्यपरिस्थितीत महाद्वाराचे काम प्रगतिपथावर आहे. या ठिकाणी सौरदिवे आहेत व पवनऊर्जेतून विद्युतनिर्मिती केली जाते. भगवानगडावर अध्यात्मासोबत विज्ञानाची सांगड घातलेली दिसते. [२] श्रीक्षेत्र भगवानगडाचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात व्हावा, भगवानगडाजवळील वनविभागाची जमीन गडाच्या विकासासाठी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. [३] भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी गडाच्या विकासासाठी कार्यभार घेतल्यावर बरीच विकासकामे केली आहेत. स्वयंपाकगृह, महिलांसाठी धर्मशाळा, महाप्रसादगृह, महिला अतिथिगृह, पारायण हॉल, कीर्तन हॉल, संत विद्यापीठ, कीर्तन-प्रवचन-टाळ-मृदुंग प्रशिक्षण वर्ग वगैरे. अंतर्गत रस्ते बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. [४] [५] श्री क्षेत्र भगवानगडावर 25 कोटींची विकासकामे पूर्ण झाली आहेत. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असणाऱ्या भगवानगडाचा राज्यभर विस्तार करण्याचा संकल्प संस्थानने केला होता. त्यानुसार सुरवातीला आळंदी, पंढरपूर येथे गडाच्या शाखा सुरू करण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद येथे ज्ञानेश्वरी अध्यासन केंद्र सोमवारपासून सुरू होत आहे. तिसऱ्या टप्प्यात पैठण येथे शाखा स्थापन होत असून, तेथील काम प्रगतिपथावर आहे. [६]