Adv Mayavati Sose

Social Worker

Personal Details

organisation Nyayadhar Foundation
date of birth October 1, 1937
education & qualification M. A. B. Ed. ( English), LLB, PGDEM, ADRS
professional summary Worked as Professor in Secondary and Senior Colleges, Worked as Advocate in Ahmednagar District Court
Awards & Achievement Founder President of Nyayadhar Foundation, Contributed to foundation since inception.
hobbies Reading, Writing, Research, Travelling etc
few facts to know सर्वात्म वंजारी-परिपूर्ण समाजदर्शनाची ओळख वंजारी समाजाचा सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाचा वेध घेणाऱ्या ‘सर्वात्म वंजारी‘ या अॅड. मायावती विठ्ठलराव सोसे लिखित संशोधनात्मक ग्रंथाचे प्रकाशन गुरुवारी (01 ऑक्टोबर 2015) झाले. या समाजावर संशोधनपर पहिलेच पुस्तक प्रसिद्ध होत आहे. केवळ वंजारी समाजच नव्हे तर महाराष्ट्रासाठी त्यांनी निर्माण केलेले हे सांस्कृतिक संचित आहे. त्याबद्दल.... अॅड. मायावती सोसे एक वकील, माजी अध्यापक, न्यायाधार संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. त्यांनी लिहिलेला 'सर्वात्म वंजारी' हा ग्रंथ वंजारी जमातीचे सर्वांगीण, परिपूर्ण दर्शन घडविणारा आहे. मागील ३ दशकांत महाराष्ट्राच्या प्रशासनात, समाजकारणात, राजकारणात सांस्कृतिक आणि शैक्षणिक विश्वात वंजारी समाजाने लक्षणीय प्रगती केलेली आहे. तथापि या समाजाच्या इतिहासाचा, संस्कृती आणि परंपरांचा वेध घेणारे संशोधनावर आधारित साहित्य तुलनेने अल्प उपलब्ध आहे. वंजारी समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सुरुवातीलाच स्पष्ट करून बंजारा या शब्दाची उत्पत्ती, त्यांचा निवास, व्यवसाय, विचार सरणी यांची तपशीलावर माहिती लेखिकेने नोंदविलेली आहे. लमाण, लभाण, वणजारा, वंजारी, बंजारा, चारण, लभाणा अशा अनेक शब्दांनी सुचविला जाणारा अर्थ लेखिकेने साक्षेपी वृत्तीने धुंडाळला. त्यासाठी वेगवेगळे गॅझेटस्, ग्रंथ, सरकारी दस्तऐवज, भारतीय व परदेशातील विचारवंतांनी केलेल्या लेखनाचा संदर्भ म्हणून विचार करतात. वंजारा हा शब्द जमातवाचक नसून तो व्यवसाय व जीवनशैलीचा निदर्शक आहे, असा विचार लेखिकेने मांडला आहे. वंजारा समाजाची व्यापार कुशलता, त्यांना त्या-त्या वेळी राज्यकर्त्यांकडून मिळालेला उदार आश्रय, काहींची नावे, त्यांच्या संपत्तीचे विवरणही सोसेंनी दिलेले आहे. मोठ्या प्रमाणात व्यापार करणाऱ्या वंजारा समाजाचे राज्यकर्त्यांशी असणारे हितसंबंध आपापसातील भांडण-तंटे, खून, मारामारी अशा बाबींचेही तटस्थपणे निवेदन लेखिकेने केले आहे. चारणांचे मूळ वसतीस्थान उत्तर प्रदेश व राजस्थान आहे. हे लक्षात घेऊन लेखिकेने भारतभर हा समाज कसा विखुरला गेला, त्याचा चिकित्सक मागोवा घेतलेला आहे. महाराष्ट्रातील वंजारा-वंजारी समाज, त्यांची उपजिविकेची साधने, त्यांच्या चालीरिती, जन्म-मृत्यू-विवाह-आदी प्रसंगीचे विधी, समजुती, श्रद्धा, रूढी-परंपरा या सर्वांवर लेखिकेने प्रकाश टाकलेला आहे. वंजारी समाजाचा सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाचा वेध घेणाऱ्या ‘सर्वात्म वंजारी‘ या अॅड. मायावती विठ्ठलराव सोसे लिखित संशोधनात्मक ग्रंथाचे प्रकाशन गुरुवारी (एक ऑक्टोबर) होत आहे. या समाजावर संशोधनपर पहिलेच पुस्तक प्रसिद्ध होत आहे. केवळ वंजारी समाजच नव्हे तर महाराष्ट्रासाठी त्यांनी निर्माण केलेले हे सांस्कृतिक संचित आहे. त्याबद्दल.... अॅड. मायावती सोसे एक वकील, माजी अध्यापक, न्यायाधार संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. त्यांनी लिहिलेला 'सर्वात्म वंजारी' हा ग्रंथ वंजारी जमातीचे सर्वांगीण, परिपूर्ण दर्शन घडविणारा आहे. मागील ३ दशकांत महाराष्ट्राच्या प्रशासनात, समाजकारणात, राजकारणात सांस्कृतिक आणि शैक्षणिक विश्वात वंजारी समाजाने लक्षणीय प्रगती केलेली आहे. तथापि या समाजाच्या इतिहासाचा, संस्कृती आणि परंपरांचा वेध घेणारे संशोधनावर आधारित साहित्य तुलनेने अल्प उपलब्ध आहे. वंजारी समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सुरुवातीलाच स्पष्ट करून बंजारा या शब्दाची उत्पत्ती, त्यांचा निवास, व्यवसाय, विचार सरणी यांची तपशीलावर माहिती लेखिकेने नोंदविलेली आहे. लमाण, लभाण, वणजारा, वंजारी, बंजारा, चारण, लभाणा अशा अनेक शब्दांनी सुचविला जाणारा अर्थ लेखिकेने साक्षेपी वृत्तीने धुंडाळला. त्यासाठी वेगवेगळे गॅझेटस्, ग्रंथ, सरकारी दस्तऐवज, भारतीय व परदेशातील विचारवंतांनी केलेल्या लेखनाचा संदर्भ म्हणून विचार करतात. वंजारा हा शब्द जमातवाचक नसून तो व्यवसाय व जीवनशैलीचा निदर्शक आहे, असा विचार लेखिकेने मांडला आहे. वंजारा समाजाची व्यापार कुशलता, त्यांना त्या-त्या वेळी राज्यकर्त्यांकडून मिळालेला उदार आश्रय, काहींची नावे, त्यांच्या संपत्तीचे विवरणही सोसेंनी दिलेले आहे. मोठ्या प्रमाणात व्यापार करणाऱ्या वंजारा समाजाचे राज्यकर्त्यांशी असणारे हितसंबंध आपापसातील भांडण-तंटे, खून, मारामारी अशा बाबींचेही तटस्थपणे निवेदन लेखिकेने केले आहे. चारणांचे मूळ वसतीस्थान उत्तर प्रदेश व राजस्थान आहे. हे लक्षात घेऊन लेखिकेने भारतभर हा समाज कसा विखुरला गेला, त्याचा चिकित्सक मागोवा घेतलेला आहे. महाराष्ट्रातील वंजारा-वंजारी समाज, त्यांची उपजिविकेची साधने, त्यांच्या चालीरिती, जन्म-मृत्यू-विवाह-आदी प्रसंगीचे विधी, समजुती, श्रद्धा, रूढी-परंपरा या सर्वांवर लेखिकेने प्रकाश टाकलेला आहे. Reference https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/society/articleshow/49157483.cms