Dr Bhagwat Karad
Chairman Marathwada Statutory Development Board
bkarad@gmail.com
9823166368
Personal Details
organisation | Bhartiya Janata Party |
date of birth | July 16, 1956 |
native place | Chikhali Ta Ahmedpur Dist Latur |
father | Kishanrao Karad |
marital status | Married |
education & qualification | MBBS, MS, M Ch. (Ped Surgery), F C P S (Gen Surgery) |
professional summary | Pediatric Surgeon and Owner of 50 bedded Dr.Karad Multi specialty Hospital & Research Center. Chairman and Managing Director at Navketan Group of Industries. SOCIAL Ex. President & Secretary of Lions Club Aurangabad, Chikhalthana. Director, Lions Club Aurangabad, Chikhalthana EDUCATIONAL Trustee – Bhagwan Shikshan Prasarak mandal, Aurangabad. -6 Colleges -4 Schools Trustee Dhanvantary Education Trust, Aurangabad. ACADEMIC : Approved Prof. of Surgery at Maharashtra Health University. - Examiner & paper setter at Surgery at Maharashtra Health University. - Honorary Prof. & visiting surgeon at Indira Gandhi Memorial Hospital, Aurangabad. POLITICAL : General Secretary of the BJP Aurangabad District 1997 -2000 - President BJP Aurangabad District 2001 – 2004 - President, BJP Bhatke-Vimukta Morcha (OBC) - Maharashtra Pradesh since 2010 – 2013. - State Secretary Maharashtra BJP (2014-15) - At Present, Vice President Maharashtra BJP |
Awards & Achievement | -Corporator of Aurangabad Muncipal Corporation – 1995 – 2009 (three terms) -Dy. Mayor of Aurangabad Muncipal Corporation – 1997 – 1998 -Mayor of Aurangabad Muncipal Corporation first time in 2000 – 2001 -Mayor of Aurangabad Muncipal Corporation (second time) in 2006 - 2007 -Candidate for Maharashtra Assembly election from Aurangabad East Constituency in 2009. -Chairman, Marathwada Statutory Development Board - Director, Rural Electrification Corporation, Govt of India |
hobbies | Social Work |
few facts to know | मी डॉ. भागवत किशनराव कराड रा. चिखली ता. अहमदपूर जि. लातूर या मूळ गावचा. मीr मूळात शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. आई, वडील दोघेही शेतात काम करत असत. शेतीसुद्धा कोरडवाहू व जेमतेम ७ एकर होती. माझे सातवी पर्यंतचे शिक्षण चिखली या जि. प.च्या शाळेत झाले तर ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण ५ कि. मी. लांब असलेल्या अंधोरी जि. प. शाळेत झाले. माझी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मी संस्थेच्या मोफत वसतीगृहात राहून अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून प्री मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९७२ साली मी संभाजीनगरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून एमबीबीएस व एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदवी संपादन केली. संभाजीनगर येथे शासन मान्य संत तुकाराम वसतीगृहात व्यवस्था झाली म्हणून शिक्षण पूर्ण होऊ शकले. अशा प्रकारे कमी वयामध्ये अनेक अडचणीस तोंड देत आपल्या स्वत:चेच नव्हे तर भावंडांचीही जबाबदारी उचलून त्यांना शिकवले व मोठे केले. मी एम.एस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील वैद्यकीय क्षेत्रातील अती उच्च पदवी एम. सीएच (पेडियाट्रीक) ही मिळवली. मराठवाड्यातील अशा प्रकारची पदवी घेणारा वैद्यकीय क्षेत्रातील मी पहिला डॉक्टर ठरलो. नंतर मी व माझी पत्नी सौ. डॉ. अंजली कराड, दोघांनीही वैâ. डॉ. वाय. एस. खेडकर यांच्या हॉस्पिटलमध्ये १९८४ साली वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. १९९० साली आम्ही समतानगर, क्रांती चौक भागात स्वत:चे ‘डॉ. कराड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर’ या नावाने हॉस्पिटल सुरू केले. मी मराठवाड्यातील पहिला पेडियाट्रीक सर्जन बनलो. लहानपणापासून एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने व गरीबीचे चटके काय असतात याची जाणीव असल्याने मी आपल्या भागातील गोरगरीबांची सेवा करायचे ठरवले. त्या वेळी लहान बालकांना मुंबईसारख्या ठिकाणी उपचारासाठी, सर्जरीसाठी जावे लागत असे. परंतु मी पेडियाट्रीक सर्जन बनल्यामुळे मराठवाड्यातून सर्व बालकांना उपचारासाठी मुंबईला नेण्याची गरज राहिली नाही. मी व माझ्या पत्नीने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोफत शिबिराचे आयोजन करून कधी करमाड परिसरातील खेड्यांमध्ये, तर कधी लाडसावंगी परिसरामध्ये आणि फुलंब्री तालुक्यातील अशा अनेक गावांमध्ये फिरलो. असे शिबिर घेत असताना कधी कधी गावातच राहावे लागायचे, अनेक वेळा रूग्णांची संख्या इतकी असायची की, उपचार रात्रभर चालायचे. मनात जसे बसून गेले होते – ‘‘समाजसेवा व गोरगरीबांची सेवा हा माणसाचा खरा धर्म आणि हया धर्माचे पालन करताना कठोर परिश्रम, हा त्याचा कर्म’’. या सर्व कामात डॉ. वाय. एस. खेडकर यांचा मोठा आधार मिळाला. अशा पद्धतीने अनेक वर्षे रूग्ण सेवा केल्यानंतर मनात असा विचार आला की, रूग्ण सेवेचे हे काम आता पूर्णपणे समाजसेवेत रूपांतर करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे समाजसेवा, विकास आणि सुशासन करण्याचे तत्व मनात घेउâन व त्या ध्येयाने १९९५ साली मी संभाजीनगर महानगरपालिका कोटला कॉलनी वॉर्डातून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलो. आतापर्यंत घेतलेले परिश्रम व गोरगरीबांच्या सेवेने मिळविलेले पुण्य लाभले आणि माझ्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळाली. तत्कालीन उपमुख्यमंत्री व भाजपा नेते कै.मा. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची आणि माझी भेट झाली. मा. साहेबांनी माझ्या कामाची प्रशंसा करून मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देवून जनतेची सेवा करण्याची संधी दिली. १९९८ साली संभाजीनगर शहराचा उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. जनतेचे प्रेम आणि आशिर्वादामुळे १९९५ ते २००९ पर्यंत ३ वेळा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. भाजपा, संभाजीनगर व येथील जनतेने मला १९९९ व २००६ मध्ये शहराचा २ वेळा महापौर करून शहराचा विकास करण्याची संधी दिली. भाजपा व कै. मा. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली २००९ साली भाजपातर्फे विधानसभा संभाजीनगर पूर्व मतदार संघातून निवडणूक लढवली. या काळात, कै.मा. मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेत शहर सरचिटणीस, शहर जिल्हाध्यक्ष, मनपा गटनेता व भटक्या विमुक्त आघाडीचा अध्यक्ष अशा अनेक जबाबदाNया पार पाडल्या. सध्या भारतीय जनता पार्टीने माझ्यावर प्रदेश चिटणीस म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे. २५ वर्षांपूर्वी मनात आलेली एक कल्पना, एक विचार आज खरोखर माझी जीवन प्रणाली बनली आहे. ‘‘समाजसेवा व गोरगरीबांची सेवा हाच माणसाचा खरा धर्म आणि हया धर्माचे पालन करताना कठोर परिश्रम, हाच त्याचा कर्म’’ |
COPYRIGHT © 2025
Designed with by Website Developer Pune - (A Marttalk Company)